शाहूवाडीत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य सोहळा उत्साहात संपन्न
Celebrating independence day of India
NEWS
Rajendra Lad
8/15/20261 min read


आंबा प्रतिनिधी : ‘स्वातंत्र्य दिन चिरायू होवो’च्या जयघोषात शाहूवाडी तालुक्यात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभातफेरी, ध्वजारोहण, देशभक्तिपर भाषणे, देश भक्तीपर गिते, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व जिलेबी वाटप अशा विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा रंगला.
तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती व शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. काही ठिकाणी माजी सैनिक व जवानांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
शाहूवाडी पंचायत समिती येथे सभापती प्रियंका भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सभापती प्रियंका भोसले, उपसभापती अमरसिंह खोत व गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शाहूवाडी तहसील कार्यालयात तहसीलदार शुभांगी जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरील मुंडा दरवाजा येथेही शासकीय इतमामात ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
फोटो ओळ : शाहूवाडी पंचायत समितीच्या वतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सभापती प्रियंका भोसले, उपसभापती अमरसिंह खोत व गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनी गौरव केला.
- श्री राजेंद्र लाड, आंबा.
Visit our other ventures
Contact
Get in touch
Email - info@shahuwadi.com
Mobile -
© 2010 - 2026. All rights reserved.
