बुरशी - पृथ्वीच्या पुनर्निर्मितीचा सूत्रधार
देवराया जशा धार्मिक आस्था जोपासतात, तशाच त्या निसर्गसंवर्धनाचं उत्कृष्ट उदाहरण आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, अभ्यासक आणि प्रशासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन अशा ठिकाणांचा संरक्षण आराखडा तयार करणे आवश्यक आहे.
- अजिंक्य बेर्डे, पर्यटन सल्लागार, आंबा




पावसाळ्याच्या आगमनानंतर सह्याद्रीच्या रांगा व देवराया पुन्हा एकदा रंग, वास आणि जैवविविधतेने खुलल्या आहेत. सामान्यतः दुर्लक्षित राहणारी पण निसर्गासाठी अत्यावश्यक असलेली बुरशीची (Fungi) उगवन (आगमन) मोठ्या प्रमाणात झाली आहे. सुकलेल्या पानांचं, लाकडांचं आणि इतर जैविक कचऱ्याचं विघटन करणाऱ्या या सूक्ष्मजीवांमुळे निसर्गाची पुनर्रचना सुरू होते. ही बुरशी म्हणजे निसर्गाकडून निसर्गाचंच संरक्षण करणारी व्यवस्था आहे.
या बुरशी प्रजाती केवळ जैविक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर पर्यावरणीय आणि औषधीय दृष्टिकोनातूनही अत्यंत मौल्यवान आहेत. त्यांच्या अस्तित्वामुळे जमिनीची सुपीकता वाढते, झाडांची मुळे पोषक घटक अधिक चांगल्या पद्धतीने शोषू शकतात आणि संपूर्ण अरण्याचा आरोग्यदायी समतोल राखला जातो असे पर्यावरण अभ्यासक निलेश माने यांनी बुरशीचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले.
निसर्गस्नेही बुरशीचे कार्य -
बुरशींचं सर्वात मूलभूत कार्य म्हणजे विघटन (decomposition). वनात गळून पडलेली पानं, कुजलेलं लाकूड, मृत प्राणी आणि इतर जैविक पदार्थ यांचं विघटन करून बुरशी कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर खनिज पदार्थ मातीला परत देतात. त्यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारते आणि नवीन वनस्पतींना पोषण मिळतं.
याशिवाय, बुरशी वनस्पतींसोबत मायकोरायझल संबंध प्रस्थापित करून त्यांना अधिक पाणी आणि खनिजे मिळवून देतात. त्यामुळे झाडं अधिक तगधारक होतात आणि दुष्काळ किंवा रोगराईला तोंड देण्याची त्यांची क्षमता वाढते.
कृषी व औषध क्षेत्रात योगदान -
कृषी क्षेत्रात बुरशीचा उपयोग वाढतच आहे. जैविक शेतीमध्ये मायकोरायझा बुरशी सेंद्रिय खतांमध्ये मिसळून पिकांची उत्पादकता वाढवते. याशिवाय, Trichoderma व Beauveria यांसारख्या बुरशींचा उपयोग नैसर्गिक कीटकनाशक म्हणून होतो. त्यामुळे रासायनिक औषधांच्या वापरात कपात होऊन पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो.
मानवी आरोग्याच्या दृष्टीनेही बुरशीचे योगदान अनमोल आहे. Penicillium या बुरशीपासून मिळालेलं पेनिसिलिन हे मानवाच्या आरोग्यातील क्रांतीकारक औषध ठरलं. याशिवाय, Aspergillus, Tolypocladium, इ. बुरशींपासून इम्युनोसप्रेसंट्स, स्टॅटिन्स, अँटीफंगल्स आणि सायकोअॅक्टिव्ह औषधे तयार केली जात आहेत.
जर बुरशी नष्ट झाली तर?
पर्यावरणातून बुरशी नष्ट झाली, तर संपूर्ण पारिस्थितिक तंत्रच ढासळेल. मृत जैविक पदार्थ विघटित होणार नाहीत, त्यामुळे पोषक घटक जमिनीपर्यंत पोहोचणार नाहीत. वनस्पती मरू लागतील, अन्नसाखळी तुटेल, औषधांचा तुटवडा निर्माण होईल आणि जैवविविधता नष्ट होईल.
तसेच बुरशींच्या अनुपस्थितीत जमिनीची बांधणी होणार नाही, जलसंधारण क्षमतेत घट होईल आणि हवामान बदलाचे प्रमाण वाढेल. हे दृश्य केवळ विज्ञान कल्पनांपुरते मर्यादित न राहता खरोखरच संभव आहे.
पर्यावरण अभ्यासक निलेश माने (कोपार्डे) आणि डॉ. पांडुरंग बागम (मानोली) यांनी येथील अंबेश्वर देवराई व घाट क्षेत्रात लुकोकोपरीनस, अँगरिकस, मायसेना, पूलुटस, लेंनिनस आणि ट्रम्पपेंट यांसारख्या दुर्मिळ बुरशी प्रजातींच्या नोंदी मिळवल्या आहेत.
संवर्धनाची गरज -
पर्यटन सल्लागार अजिंक्य बेर्डे म्हणतात, “अंबेश्वर देवराईतील जैवविविधता केवळ पर्यावरणासाठी नाही, तर इथल्या स्थानिक पर्यटनालाही नवा आयाम देऊ शकते. ही संपत्ती जपण्याचं भान प्रत्येकाने ठेवणं आवश्यक आहे.”
देवराया जशा धार्मिक आस्था जोपासतात, तशाच त्या निसर्गसंवर्धनाचं उत्कृष्ट उदाहरण आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, अभ्यासक आणि प्रशासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन अशा ठिकाणांचा संरक्षण आराखडा तयार करणे आवश्यक आहे.
निसर्गसाक्षरतेकडे वाटचाल -
आंबा- विशाळगड जंगल,अंबेश्वर देवराई परिसरात पर्यावरण अभ्यासक निलेश माने व डॉ. बागम यांनी बुरशीवर संशोधन केले आहे. यावर आधारित स्थानीक शाळा, महाविद्यालये, पर्यावरण गटांनी मोहीम राबवून बुरशी संवर्धनाविषयी जनजागृती करणे, फंगल वॉक, मायकोलॉजी वर्कशॉप, आणि स्थानिक भाषेतील माहिती पुस्तकांचे प्रकाशन हे पुढील टप्पे असू शकतील.
(बुरशी ही केवळ सडणारी वस्तू नाही, तर पृथ्वीच्या पुनर्निर्मितीची सूत्रधार आहे. अंबेश्वर देवराईसारख्या ठिकाणी या जैविक शिल्पकारांचं अस्तित्व जपणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.)
- आर. एस .लाड, आंबा
Fungi in Shahuwadi
Fungi play a vital role in maintaining the balance of ecosystems. They act as nature’s recyclers, breaking down dead organic matter and returning essential nutrients to the soil. This process supports plant growth, enhances soil fertility, and maintains forest health. Many fungi form symbiotic relationships with trees, aiding in water and nutrient absorption. They also serve as food for various insects and animals, forming an integral part of the food web.
The forests of Shahuwadi taluka, nestled in the Western Ghats, are a treasure trove of biodiversity and proudly host several rare and unique species of fungi. These include bioluminescent fungi and other medicinal varieties, found especially during the monsoon. Their presence not only indicates a healthy ecosystem but also adds to the ecological and scientific significance of the region. Protecting these rare fungi is essential for preserving the natural wealth and ecological balance of Shahuwadi's forests.






Nature's Bravery
Experience the beauty and bravery of Shahuwadi's natural treasures.
Shahuwadi is a breathtaking place, showcasing nature's beauty and rich history. A must-visit for nature lovers!
Anjali Patil
Shahuwadi
The landscapes of Shahuwadi are stunning, filled with lush greenery and rich culture. Truly a hidden gem worth exploring for anyone who loves nature!
Ravikishor Pawar
Kolhapur
★★★★★
★★★★★
Shahuwadi.com
Explore the bravery and natural beauty of Shahuwadi.
Contact
Get in touch
Email - info@shahuwadi.com
Mobile -
© 2025. All rights reserved.